🌟अपघात मुक्त प्रवास आपली जबाबदारी ही लोकचळवळ व्हावी - सचिन निकम


🌟कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी रासेयो शिबीर हसनापूर येथे आयोजित शिबिरात ते म्हणाले🌟

आजच्या धकाधकीच्या जीवनात यंत्राच्या वेगाने मानवी मन सुसाट बनले आहे. अनियंत्रित गाड्या, नियमबाह्य असुरक्षित वाहतूक, साध्या मोबाईलला आपण कव्हर घेतो माञ हेल्मेट विना टू व्हीलर चालवतो प्रसंगी अपघातात मृत्यू मुखी पडतो किंवा अपंगत्व येत.मोबाईल फुटला तर दुसरा घेता येईल बहुमोलाचा मेंदू चिरडला गेला तर या विज्ञान युगात दुसरा मेंदु बनवता येईल का या मुलविचाराशी फारकत घेत आपला जीवन प्रवास सुरू असतो हे सारे अविवेकी आणि अज्ञानाचच लक्षण आहे.वाहन चालकांनी अवधान राखत नियमानुसार सावधपणे वाहन चालवून अपघात मुक्त प्रवास हे कर्तव्य पार पाडत लोकप्रबोधनातून लोकचळवळ उभारावी असे आवाहन परभणीचे एआरटीओ सचिन निकम यांनी केले कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी रासेयो शिबीर हसनापूर येथे आयोजित रोड सेफ्टी अभियानांतर्गत शिबीरार्थीनीं व गावकऱ्यां साठी परभणीचे एआरटीओ सचिन निकम,आकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

   रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत  जनसामान्यांनी रस्ता ओलांडताना, रस्त्याने चालताना नियम पाळावे.अपघात टाळावे वेळे आधी निघावे वेळेत पोहचावे ,गतीवर नियंत्रण ठेवत वाहन चालवावे, सुरक्षित अंतर ठेवावे अपघात मुक्त माणूस आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय परिवहन कार्यालयाचे सह.मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे यांनी केले.व्यासपिठावर मदनराव खरडे ,प्रकाशराव खरडे ,शंकरराव कदम, सुभाषराव खरडे, पंजाबराव खरडे,भीमराव खरडे, सदाशिव आप्पा खरडे,रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक प्रा.अरुण पडघन,कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नसीम बेगम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा मोरे हिने केले.तर आभार सपुरा अंजूम हिने मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या