🌟देशात ‘रामराज्या’साठी ‘सबका विश्‍वास’ महत्वाचा.....!


🌟खासदार श्रीमती फौजिया खान यांची राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका🌟

परभणी (दि.06 फेब्रुवारी) : खर्‍या अर्थाने सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वासच या देशात रामराज्य आणू शकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत व्यक्त करतेवेळी मोदी सरकारवर जोरदार टिका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडतांना युवक, महिला, गोर-गरिब आणि शेतकरी या चार स्तंभांना महत्व देताहेत खरे, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावनीत, कृतीत ते फारसे दिसून येत नाही, अशी टिका खासदार श्रीमती खान यांनी केली.

            केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारल्या. महिलांसाठी ‘नारी शक्ती वंदन’ असा ठराव मंजूी केला. दुर्देवाने या ठरावाची तात्काळ अंमलबजावनी केली नाही. त्यासाठी राजकीय किंमत मोजावी लागेल, या भितीपोटीच सरकारने अंमलबजावनी लांबणीवर टाकली, असा आरोप करतेवेळी श्रीमती खान यांनी महिला सक्षमीकरणाकरीता राजाराम मोहन रॉय असो, महात्मा ज्योतीबा फुले यांनी मोलाच्या भूमिका बजावल्या.  त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या विषयात राजकीय किंमत मोजावी लागेल याची भिती न बाळगता महिलांसाठी ठोस असे निर्णय घेतले, असे निदर्शनास आणून श्रीमती खान यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी मलिक प्रकरण असो की बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे धोरण असो, मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार असो की महिलांवरील अत्याचाराचे चार टक्क्यांनी वाढलेले प्रमाण असो याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. उल्हास नगरातील पोलिस ठाण्यात भाजपाच्या आमदाराद्वारे गोळीबाराचा निषेधार्ह प्रकार, 13 हजार युवकांच्या आत्महत्येचा विषय, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांचा विषय असो, एकूण युवक, महिला, सर्वसामान्य शेतकर्‍यांना हे सरकार कुठेच दिलासा देवू शकले नाहीत, अशी जोरदार टिका करतेवेळी श्रीमती खान यांनी मग खर्‍या अर्थाने या देशात आपण सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वासावर रामराज्य आणू शकू का? असा सवाल केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या