🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟तर एकनाथ खडसे यांच्या संपत्तीचा लिलाव होईल ; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ🌟

* ते जय श्रीराम म्हणतात,मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो ; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

* मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत मिरासाहेब दर्ग्याला चर्मकार समाजाचा मानाचा गेलेफ अर्पण*

* जयंत पाटलांच्या होम पिचवर अजित पवार,विरोधकांच्या मध्ये एक वाक्यात नाही, सगळे सैरावैरा पळत आहेत - अजित पवार

* सांगलीतील कुपवाड येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

* सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, आम्हीही लढू, रोहित पवार यांचं ओपन चॅलेंज

* मिरजेत गायींची वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन पकडली, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्ष समितीने वासरांची केली सुटका

* तुम्ही तर प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आलात,जितेंद्र आव्हाडांच्या टिकेनंतर आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल

* भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक

*अट्टल गुन्हेगार आसिफ दाढीने घेतली अजित पवारांची भेट

* अजितदादा पवार  बारामतीत सायकलवर फिरायचे, माणसाने इतकं कृतघ्न असू नये; संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

* रोहित आर.आर.पाटलांची कर्तव्य संवाद यात्रा सुरू

*खासदार अमोल कोल्हे यांची राम मंदिरावरची कविता तुफान व्हायरल; संसदेतील व्हीडिओची सर्वत्र चर्चा

* श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे बाळराजे,हाडवैद्याला आम्ही खासदार केले - संजय राऊत

* मिरजेत हिंदू  मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या मिरासाहेब दर्ग्याला पोलिस प्रशासनाचा परंपरेने शासकीय सलामी देऊन गलेफ अर्पण

* मी सुषमा अंधारेंना नाही,सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देतो -- आमदार संजय गायकवाड

* तर एकनाथ खडसे यांच्या संपत्तीचा लिलाव होईल ; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ

* जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, रुपाली चाकणकर म्हणाल्या तेलघाले जितेंद्र आव्हाड  पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहे

* जयंत पाटलांच्या होम पिचवर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे अजित पवारांनी केले दिमाखात उद्घाटन

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय आमदार बाबर कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट

* गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसच्या महिला मेळाव्यात १० हजारच्या वर महिलांची हजेरी

* माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार, मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तक वाचतो : नितेश राणे

* जे ७० वर्षांत मिळाले नाही ते आमच्या आंदोलनातून मिळाले आहे - मनोज जरांगें 

* कोण कसा वागतोय याचा लेखाजोगा देव ठेवत असतो - उध्दव ठाकरे

* युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर शिंदे गट आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

* सत्तेला हापापलेलो नाही,सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झालो : उपमुख्यमंत्री अजित पवार

* ज्येष्ठ कादंबरीकार आणि कथाकार मनोहर शहाणे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*

* एक देश एक निवडणुकीला शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा ; माजी राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित दिले समर्थन

* शासकीय कंत्राटदारांना राजकीय गुंडापासून संरक्षण द्या, कायद्यासाठी कर्मचारी आक्रमक; फेब्रुवारीअखेरपर्यंत कायदा न केल्यास विकासकामं बंद करण्याचा इशारा

* महाराष्ट्र पाणी देऊ शकत नसेल, तर कर्नाटकात जाऊ" मंगळवेढ्यातील 24 गावांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितल्याने खळबळ

* कुटुंबातील लोक राजकारणात असणं गैर नाही पण पक्ष एकाच व्यक्तीभोवती फिरणं हे चांगलं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

* झारखंडमध्ये चंपई सोरेन यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला; सोरेन यांच्या सरकारला 47 आमदारांचा पाठिंबा मिळाला. तर, विरोधात 29 आमदारांनी मतदान केले

* चिलीत जंगलांमध्ये भीषण आग; अग्नितांडवात 46जणांचा मृत्यू, 1100 घरं जळून भस्मसात; दक्षिण आणि मध्य भागात आगीचा सर्वाधिक फटका

* इंग्लंडची धूळदाण, टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय; बुमराह-अश्विनचा प्रभावी मारा यशस्वी, WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप.....

  ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या