🌟राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच व्यक्तीमत्व विकास : सुशिल भिमजियाणी


🌟अडगाव हजारे येथे गोटे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न🌟


फुलचंद भगत

वाशिम :  राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच व्यक्तीमत्व विकास असून, रासेयो आणि व्यक्तीमत्व विकास हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते सुशिल भिमयाणी यांनी मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्यावतीने दत्तक ग्राम अडगाव हजारे येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरमध्ये दि. 26 फेब्रुवारी रोजी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्राची एस. पाथरकर, ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते राजु धोंगडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचे आराध्य दैवत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.


यावेळी पुढे बोलतांना सुशिल भिमजियाणी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हे असे सशक्त माध्यम आहे. ज्यातून व्यक्तीमत्वचा परिपूर्ण विकास घडतो. येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी सामाजीक जाणीव ठेवून समाजासाठी आपले योगदान देण्यात कुठलीही कसर ठेवू नये, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समाजकार्यासाठी सदैव तत्पर असला पाहिजे. त्यातूनच त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडतो यासह अनेक विविध उदाहरणे देवून त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका मिरा हजारे, व मतदनीस ज्योती खिल्लारे, विद्यार्थी-विद्यार्थींनीसह गावकर्‍यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास बी. चांदजकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी भारत पट्टेबहादुर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता रुक्के, विद्यार्थींनी प्रतिनिधी मानवी वानखेडे, वैष्णवी ठाकरे, विद्यार्थी प्रतिनिधी अशोक गुडदे व फ्रेड्‌स गृप यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या