🌟पुर्णा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षपदी जनार्धन आवरगंड....!


🌟तर पुर्णा तालुका ग्राहक पंचायतच्या महिला तालुका अध्यक्षपदी राधाताई दुधाटे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली🌟

पुर्णा :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी जनार्धन आवरगंड, महिला तालुका अध्यक्षपदी राधाताई दुधाटे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी ताडकळस येथे कार्य झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आत्माराम आंबोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी प्रांत अध्यक्ष विलास मोरे,जिल्हा संघटक धाराजी भुसारे,ॲड मिराताई शेळगावकर, गंगाधर कानेकर, मधुकर मुळे व इतर मान्यवरांची उपस्थित होती.


 
मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी पूर्णा शहराध्यक्षपदी सय्यद सलीम सय्यद मुनसब यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी ताडकळस येथील शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ताडकळसच्या शाखा अध्यक्षपदी उत्तम आंबोरे, सचिवपदी ज्ञानराज आंबोरे, संघटकपदी आत्माराम आंबोरे, उपाध्यक्षपदी विजयमाला कदम, सलागार सुरेंद्र आंबोरे, कोषाध्यक्ष पदी शैलजा सुर्यवंशी, कविता फुलवरे, चित्राताई कस्तुरे, वर्षा कनकुटे, मिना आवतारे, अमोल आंबोरे, करिम खॉं पठाण आदींची निवड करण्यात आली. यावेळी विलास मोरे यांनी ग्राहकांना त्यांच्यावर होत असलेल्या फसवणुकीबद्दल कुठे दात मागायची व फसवणूक होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे व तसेच ग्राहक संरक्षण कायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सुरेंद्र आंबोरे, प्रस्ताविक जनार्दन आवरगंड तर आभार प्रदर्शन  राधाताई दुधाटे  यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या