🌟पुर्णेतील अभिनव विद्या शाळेच्या सन १९९६ च्या इयत्ता दहावी बॅच मधील मित्र/मैत्रीणी २८ वर्षानंतर एकत्र आले एकत्र.....!


🌟स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आनंद अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते🌟

पुर्णा (दि.१२ फेब्रुवारी) - पुर्णा शहरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव विद्या विहार प्रशाला शाळेत शिक्षण घेतलेले व सन १९९६ च्या दहावी वर्गातील विद्यार्थी मित्र/मैत्रिणी शिक्षका सह तब्बल २८ वर्षाच्या कालावधी नंतर स्नेह शाळेकडून आयोजित संमेलनाच्या निमिताने आले एकत्रित आले रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेच्या दरम्यान स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्या विहार शाळेचे अध्यक्ष आनंद अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.उंडेगावकर सर तर प्रमुख उपस्थितांमध्ये श्री.हिराजी भोसले सर श्री.तांबे सर,श्री पाईकराव सर श्री.यमगर सर,श्री.शिदे सर,श्री माने सर,श्री.गायकवाड सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रथमतः विद्येची देवता सरस्वती दवीसह माँ साहेब जिजाऊ आणि क्रांतीज्योती माता सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्वागत गीत व जे विद्यार्थी शिक्षक मृत्यु पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली अर्पण करून राष्ट्रगीत घेण्यात आले यानंतर सन्माननीय गुरुजन शिक्षकांसह सेवकांचा यावेळी सन्मानचिन्ह (गौरवचिन्ह) देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांनी सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सुत्रसचलन रेखा जोंधळे,मिना भालेराव तर प्रास्ताविक डॉ.सचिन भायेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश लोखंडे,अमोल सोनटक्के,सचिन जैस्वाल आदींनी विशेष परिश्रम घेतले.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या