🌟नाशिक येथील अंबड पोलिस स्थानकात गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या...!


🌟आत्महत्या केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव अशोक नजान असे आहे🌟

नाशिक : नाशिक शहरातील अंबड पोलिस स्थानकात गुन्हें शाखेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस निरिक्षक अशोक नजान या पोलिस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकातच स्वतःच्या कॅबीन मध्यें रिवाल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास घडल्याने नाशिक जिल्हा पोलिस दलात खळबळ माजली आहे.


नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस निरीक्षक अशोक नजन वय ४० वर्ष या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्थानकातच स्वतःच्या केबिनमध्ये आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या पिस्तूलमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली पोलीस निरीक्षक अशोक नजान यांनी नेमकी आत्महत्या का व कोणत्या कारणास्तव केली याचे कारण अद्याप देखील समोर आलेलं नाह या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस स्थानकात दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू असून काल बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस स्थानकातच पोलिस अधिकाऱ्याने बंदुकी मधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्थानकात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खबर पहाता पहाता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अंबड पोलिस स्थानकाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या