🌟पुर्णा तालूक्यातील मौजे वझूर येथील अवैध रेतीसाठ्याचा लिलाव....!


🌟तालुक्यातील वजूर येथील २५ ब्रास व कान्हेगावातील ३५ ब्रास अवैध रेती साठ्याचा दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४ वाजता लिलाव🌟 

परभणी/पुर्णा (दि.१२ फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे वझूर येथील २५ ब्रास व मौजे कान्हेगांव येथील ३५ ब्रास जप्त केलेल्या अवैध रेती साठ्याचा जाहीर लिलाव बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता तहसिल कार्यालय पूर्णा येथे आयोजित करण्यात आल्याचे तहसिलदार पूर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

या अवैध रेतीसाठ्याच्या लिलावात सहभागी होऊ इच्छिणारांनी अटी व शर्तीस अधीन राहून बोली बोलावी.  सहभागी व्यक्तीकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या रेती साठ्यासाठी प्रतिब्रास रु. ६०० सरकारी किंमत निश्चित करण्यात आली आहे. लिलावधारकाने अंतिम केलेली संपूर्ण रक्कम ३ दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरावी लागेल. लिलावाची संपूर्ण रक्कम विहित कालावधीत भरणा न केल्यास ती अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. लिलावधारकास बोलीची रक्कम ग्रास प्रणाली मार्फत स्वत: भरणा करुन चलनाची प्रत दाखल करावी लागेल. शासन निर्णयानुसार जीएसटी कराचा भरणा करणे लिलावधारकास बंधनकारक राहिल व त्याबाबत हमीपत्र सादर करावे लागेल. 


वाळू लिलाव अंतिम झाल्यानंतर लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची १० टक्के रक्कम जमा करावी लागेल. लिलावधारकाने रेतीसाठ्याची संपुर्ण रक्कम भरणा केल्यानंतर रेतीसाठ्याचा रितसर ताबा देवून रेती साठ्याचा उचल करण्याची परवानगी देण्यात येईल.  लिलावधारकास रेती साठा ४० ब्रास प्रतिदिन या प्रमाणात त्यांच्या स्वखर्चाने साठवणूक केलेल्या ठिकाणावरुन उचल करावी लागेल व अशा रेती साठ्याची वाहतूक करणेसाठी अधिकृत वाहतूक पासेस जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथून उपलब्ध करुन देण्यात येईल. रेतीसाठा पाहुणच लिलावामध्ये भाग घ्यावा. लिलाव अंशतः रद्द करणे किंवा पूर्ण रद्द करणे, काही कारणास्तव त्यात बदल करणे इ. अधिकार तहसिलदार पूर्णा यांनी राखून ठेवले असल्याचे कळविले आहे. 

               *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या