🌟महासंस्कृती महोत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी घेतला आढावा....!


🌟विष्णु जिनींग मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकारी यांनी केली प्रत्यक्ष पाहणी🌟 

परभणी : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमितत राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातनू वसमत रोड, परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज विष्णु जिनींग मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या पूर्वतयारीचे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मंच, मान्यवर आणि प्रेक्षकांची आसन व्यवस्था, स्टॉल, पार्किंग आदींची पाहणी करत संबंधीतांना आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यासह विविध अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या