🌟बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालयामार्फत लेक लाडकी योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने तिला 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येणार🌟 

परभणी (दि. 27 फेब्रुवारी) : बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी या कार्यालयामार्फत 'लेक लाडकी ही योजना' राबविली जात आहे. दि. 1 एप्रिल 2023  नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने  तिला रुपये 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येत आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत 'लेक लाडकी ही' नवीन योजना सुरु करण्यात आली असून मुलीच्या जन्मास  प्रोत्साहन देवून मुलींच्या जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मत्यु दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.

 जिल्ह्यायातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील 1 एप्रिल, 2023 नंतर  जन्मलेल्या मुलींच्या पालकांनी विहीत नमुन्यात अर्ज नजीकच्या अंगणवाडी केंद्रात सादर करावे असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प)  मिलिंद वाघमारे यांनी केले आहे......   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या