🌟परभणी मनपाचे मा.आरोग्य सभापती तथा नगरसेवक प्रा. मंचकराव देशमुख यांना पितृशोक.....!


🌟ज्येष्ठ नागरिक प्रा. मंचकराव नरहरराव देशमुख परळीकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन दुःखद निधन🌟 

परभणी (दि.०३ फेब्रुवारी) : परभणी महानगर पालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांचे वडील तथा  वैभव नगर येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक प्रा.मंचकराव नरहरराव देशमुख परळीकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज शनिवार दि.०३ फेब्रुवारी रोजी खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर परभणी येथील जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज शनिवार दि.०३ फेब्रुवारी रोजी रात्री ०८-०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा.मंचकराव देशमुख यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आई सेवाभावी संस्थेचे सुरज देशमुख यांचे ते वडिल होत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या