🌟नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची चक्री उपोषण व निदर्शन करणाऱ्यांना भेट देण्यासही टाळाटाळ🌟
महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा साठी लागू असलेल्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधन करण्याच्या नावाखाली सिख धर्मियांच्या धार्मिक बाबींमध्ये शासकीय/राजकीय हस्तक्षेपाला प्राधान्य देण्याच्या दुष्ट हेतूने नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ हा काळा कायदा अंमलात आणला हा काळा कायदा स्थानिक हुजरी सिख समुदायाच्या धार्मिक अधिकार व मुलभूत पारंपरिक हक्कांवर गधा आणणारा असल्यामुळे स्थानिक सिख समुदायामध्ये या नवीन कायद्या विरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारने दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पास केलेला नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्यामुळे सिख धर्मियांच्या धार्मिक बाबींमध्ये सरकारला वेळोवेळी संधी प्राप्त होणार असल्यामुळे सिख समुदायामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असून दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सरकारच्या या नवीन कायद्या विरोधात सिख समाजाकडून ऐतिहासिक जाहीर विरोध मोर्चा तर काढण्यात आलाच याशिवाय नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिख समुदायाकडून चक्री उपोषणासह निदर्शनास देखील सुरुवात करण्यात आली असून या चक्री उपोषणाचा आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी चौथा दिवस उजाडला असतांना देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या जवाबदारीचे भान न राखता संबंधित निदर्शकांसह उपोषणार्थींची साधी भेट देखील घेतली नाही वास्तविक पाहता जिल्ह्याचे जवाबदार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर चक्री उपोषणास बसलेल्या सिख बांधवांची त्यांनी प्रत्यक्षपणे भेट घेऊन त्यांचे म्हणणे महाराष्ट्र राज्य सरकारला कळविले आवश्यक होते परंतु संबंधित चक्री उपोषण व निदर्शनस्थळाला त्यांनी अद्यापही भेट दिली नाही त्यामुळे संपूर्ण सिख समुदायामध्ये संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारने मनमानी पद्धतीने लागू केलेल्या गुरुद्वारा अधिनियम २०२४ या काळ्या कायद्या विरोधात आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी लोकशाही मार्गाने चक्री उपोषणास निदर्शन करणाऱ्यांमध्ये स.किरपाल सिंघ हजुरिया,स.जसपाल सिंघ लांगरी,स.हरजितसिंघ गिल,स.मनप्रीतसिंघ नहंग,स.मनिंदरसिंघ काटकर,स.हरप्रीतसिंघ काटगर,स.गुरुदीपसिंघ संधू,ज्ञानी तेजा सिंघ बावरी अध्यक्ष महाराष्ट्र सिखलीकर सेवादार,रामसिंघ टाक सेवादार,चरणसिंघ टाक,राजासिंघ बावरी,बल्लूसिंघ बावरी,महेंद्रसिंघ पैदल,परमेश्वर पाटिल लौंडे,मुरली पाटिल लौंडे आदींचा समावेश असून मागील चार दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र सरकारने पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या काळ्या कायद्या विरोधात मोर्चा आंदोलन चक्री उपोषण सुरू असतांना देखील निद्रिस्त प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक सिख समुदायामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारने तात्काळ हा काळा कायदा रद्द केला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही......
🌟तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार - सरदार रविंदरसिंघ बुंगई
महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेला काळा कायदा तात्काळ रद्द केला नाही तर सिख समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव सरदार रविंदरसिंघ बुंगई यांनी जंग-अजित न्युज वेबवृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितले ते पुढे बोलतांना म्हणाले की महाराष्ट्र सरकार पुर्वीच्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ मध्यें सुधारणा करण्याच्या नावावर नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा कायदा अंमलात आणून सिख धर्मियांच्या मुलभूत धार्मिक बाबींमध्ये सरळसरळ हस्तक्षेप करु पाहत आहे परंतु सिख समुदाय हे कद्दापी खपवून घेणार नाही आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून त्यांना सिख समुदायाची ताकत निश्चितच दाखवून देऊ असेही सरदार रविंदरसिंघ बुंगई म्हणाले....
0 टिप्पण्या