🌟नांदेड तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डावर राज्य सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा १० वा दिवस...!


🌟नांदेड जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : आंदोलक संतप्त🌟

नांदेड (दि.१८ फेाब्रुवारी) - महाराष्ट्र राज्य शासनाकडून गुरुद्वारा बोर्डावर गुरुद्वारा अधिनियम-२०२४ संमत करून लादला जात असल्याने त्या विरोधामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची मागील नऊ दिवसापासून जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 


   जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम २०२४ संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज दहावादिवस असून आज चक्री उपोषणचा आज रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी दहावा दिवस उजाडला असून आज सकाळी उपोषणास स. किरपाल सिंघ हजुरिया स.जसबीर सिंघ धुपिया स.गुरमीत सिंघ बेदी स.राजवीर सिंघ बुगंई यांनी सहभाग नोंदवला त्यांना स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले मनबीरसिंघ कारागीर,शेर सिंघ फौजी रविन्दर सिंघ बुंगई  रविन्दर सिंघ पुजारी गुरमीत सिंघ  महाजन जगदीप सिंघ नम्बरदार मनबीर सिंघ ग्रंथि   दीपक सिंघ गल्लीवाले राजेंद्र सिंग पुजारी दीपक सिंह हजुरिया मनिंदर सिंग राज रामगड याजसबीर सिंघ बुंगई प्रेमजीत सिंघ शिलेदार    स. जर्नल सिंग गाडीवाले अमरप्रीत सिंघ हंडी हरभजन सिंघ पुजारी भोला सिंघ गाड़ीवाले दीपक सिंघ हजूरिया बीरेंद्र सिंघ बेदी जगजीत सिंघ खालसा महेन्दर सिंघ पैदल सुरेंद्र सिंग मेंबर  जसपाल सिंग लांगरी अवतार सिंग पहरेदार स.गुरुदीप सिंघ संधू हरजीत सिंग गिल स.अमरजीत सिंग कुंजीवाले स.भोला सिंग गाडीवाले यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला चक्री उपोषणाला आज रविवार रोजी दहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर रमेश गांजापुरकर.डि बी जांभरुडकर. इंजिनीयर. प्रांजली रावणगावकर .सुभाष रावणगावकर माजी आमदार गंगाधर रावजी पटणे व किरण चिद्रावार जी  जनता दल सेक्युलर व दिव्य अमृत कंट्रक्शन चे मॅनेजिंग डायरेक्टर स. रोशन सिंघ माली व विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या