🌟आजच्या तरुणांनी भविष्याचा विचार करावा - निवृत्ती महाराज इंदोरीकर


🌟असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी सेनगाव येथील किर्तनात केले🌟

हिंगोली : दोन मिनिटांचा राग आयुष्य संपवू शकते तर दोन मिनिटांचा संयम आयुष्य बदलते तरुणांनी भविष्याचा विचार करावा भावनेच्या आहारी जाऊन भविष्य बिघडवु नये शिवाजी महाराज छत्रपती नव्हते  तर ते प्रजापालक छत्रपती होते म्हणून छत्रपती झाले त्यांचे महान कार्य अमलात आणा निश्चितच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी सेनगाव येथील कीर्तनात मंगळवार ता २७ रोजी केले

सेनगाव शहरातील जिल्हा परिषद प्रांगणात मंगळवार ता २७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इंदोरीकर महाराज यांच्या समाज प्रबोधन कीर्तन सोहळ्याचे आयोजन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले नगरपंचायत नगराध्यक्षा गायत्री गजानन देशमुख, व्यापारी महासंघ अध्यक्ष राजकुमार देशमुख, श्री गजानन पेट्रोलियम व गजानन एजन्सी यांच्या वतीने कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंदोरीकर महाराज, गायनाचार्य बालासाहेब सुरेगावकर, नागेश नान किल्ले  मृदंगाचार्य हनुमान शिंदे, माऊली कु-हे यांच्यासह भजनी मंडळी उपस्थित होते 

यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले शिवाजी महाराज यांचे कार्य महान आहे शिवाजी महाराज छत्रपती का झाले ते छत्रपती नव्हते तर प्रजापालक छत्रपती होते म्हणून छत्रपती झाले त्यांचे विचार व महान कार्ययाचे आत्मचिंतन करून तरुणांनी अंमलबजावणी केली तर निश्चितच आयुष्य सुधारू शकते आज घडीला समाजातील वातावरणाचा विचार करण्याची गरज आहे कोणीच कोणाचे नाही ज्याची त्याची प्रारब्ध, संचित त्याची त्यांनीच घडवावे. लक्षात ठेवा लाचार झालेल्याला धर्म कळत नाही स्वाभिमान विकलेल्या माणसाकडून कधीच अपेक्षा पूर्ण होत नाही

आज घडीला लोक तुमचा युज अँड थ्रो म्हणून वापर करतात हे लक्षात येणे गरजेचे आहे फक्त जग मी पणामुळे संपत चालले आहे मुलांनी आई-वडिलांचे कर्तव्य  विसरु नये गरिबाला इज्जत महत्त्वाची असते तर ईस्टेट महत्त्वाची नाही कुटुंबातील मुलींच्या सर्व हालचाली आईलाच माहिती असतात त्याकडे दुर्लक्ष करू नये

काम क्रोध मायामुळे होत्याच  नव्हतं होते दोन मिनिटाचा राग आयुष्य संपवू शकते तर दोन मिनिटांचा संयम आयुष्य बदलू शकते तरुणांनी दंगली पिंगलीला बळी पडू नये भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय धोकादायक असतो चांगले विचार मनात बळवून त्या दृष्टीने कार्य केल्यास चांगले फळ मिळेल शेतकऱ्या च्या पोराला भविष्य आहे परंतु घरचा किराणा व भाजीपाला वरच्यावर जोडला तर शेतकरी जगू शकतो शेतकऱ्यांच्या मुलांनी कोणताही छोटा उद्योग व्यवसाय करावा महाराष्ट्रातील वृद्धाश्रमात आज पर्यंत शेतकऱ्यांचे आई वडील नाहीत ही गर्वाची गोष्ट आहे किर्तन सोहळ्याला असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.....

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या