🌟परभणीत महासंस्कृती महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅलीचे आयोजन....!


🌟यामध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते🌟


परभणी (दि. 07 फेब्रुवारी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन परभणी यांच्या माध्यमातून परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


या महोत्सवानिमित्त आज राजगोपालचारी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विष्णु जिनींग मिल या मार्गाने शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकूळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती संगीता चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रा. गणेश शिंदे, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या