🌟भारत देशामध्ये बुद्ध धम्म पुनर्जीवित करण्याचं महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले....!


🌟दक्षिण कोरियाचे भिकू हाँग जिन सू यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : पुर्णा या ठिकाणी २१ वी बौद्ध धम्म परिषद व  स्मुर्तिषेश भदंत उपाली थेरो यांचा ४१ वा स्मुर्तिदिन अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उप गुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली बुधवार दि.३१ जानेवारी व गुरुवार दि.०१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी करण्यात आले होते.

बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने दुपारी तीन वाजता डॉ. आंबेडकर नगर येथून पूजनीय भिकू संघ श्रामनेर संघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सजविलेल्या रथा मधून भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीचे मुख्य आकर्षण प्राध्यापक बंडू गायकवाड प्रस्तुत पंचशील नाट्य ग्रुप   विद्यार्थिनीचे  लेझिम पथक हे होते.

रॅली डॉ.आंबेडकर नगर येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून समारोप बुद्ध विहार येथे जाहीर धम्म परिषदे मध्ये झाले.अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय भिख्खू संघाचे संघनायक  भिख्खू करुणा नंद महाथेरो हे होते.या वेळी लिंबूनी स्मरणिकेचे प्रकाशन दक्षिण कोरिया येथील भिख्खू हाँग जीन सू कोरियन बुद्धीस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.ली ची ऱ्यान व अखिल भारतीय भिख्खू संघाच्या हस्ते करण्यात आले.या वेळी  भिख्खू हाँग जिन सू यांनी संबोधित करताना सांगितले भारत देशा मध्ये बुद्ध धम्माचे पुनर्जीवन बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

जगाच्या पाठीवरील बौद्ध देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदराचे स्थान आहे.महायान पंथातील बोधिसत्व संकल्पना त्यांनी स्पष्ट केली.कोरियन बुद्धीस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ली ची ऱ्यान यांनी बौद्ध कालीन वैद्यक शास्त्रा चा गौरवशाली इतिहास विशद केला.करुणा नंद थेरो यांनी प्राचीन काळी हा देश बौद्ध मय होता.उत्खनन मधून ते स्पष्ट होत आहे.धम्म सेवक महाथेंरो यांनी शिल सदाचार बुद्ध विचार प्रणाली आच रणात आणून आदर्श बौद्ध उपासक उपसिका व्हा.तसा संकल्प करा.

गुरुवार दि.०१ फेब्रुवरी २०२४ धम्म परिषदेचा दुसरा दिवस भिख्खू महावीरो,भिख्खू रेवत बोधी,प्रा.डॉ सत्यपाल महाथेरो,विपश्यना चार्य भिख्खू पया रत्न थेरो आदींची प्रवचने अतिशय उदबोधक होती.डॉ.उपगुप्त महा थेरो यांनी पूजनीय भिख्खू संघाचा परिचय करून दिला परिषद आयोजन पाठीमा गची भूमिका विशद केली.मुख्य संयोजक भंते पाय्यावांश यांनी परिषद आयोजनासाठी परिश्रम घेतले.त्यांना सहकार्य भिख्खू बोधीधम्मा भिख्खू संघ रत्न यांनी केले.

विविध प्रभागातील धम्म सेवेतील महिला मंडळ विहार समिती तरुण मित्र मंडळ  भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल स्काऊट गाईड सुभेदार रामजी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी पोलिस संघटना नांदेड सामाजिक   धार्मिक  शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर लोक प्रतिनिधी आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या