🌟वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील पत्रकार प्रकाश आडे एक्सलंट जर्नालिष्ट पुरस्काराने सन्मानित.....!


🌟मुंबई येथे प्रकाश आडे यांना एक्सलंट जनरलिस्ट पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देन्यात आला🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मुंबई येथे ग्रामीण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार संगटना कारंजा तालुका अध्यक्ष प्रकाश साहेबराव आडे यांना एक्सलंट जनरलिस्ट पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देन्यात आला.


               सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून  विशेषतः ग्रामीण भागामध्येअनेक लोकांच्या मदती केल्यामुळे हा पुरस्कार प्रकाश आडे यांना प्रदान करण्यात आला आहे.पञकारीता क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सह्याद्री देवराई वृक्ष संवर्धन संस्थेचे संस्थापक, ख्यातनाम मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट स्टार, सयाजी शिंदे यांच्या हस्ते 'बेस्ट वर्क इन हेल्थ केअर अँड वेलनेस' या क्षेत्रातील 'महाराष्ट्र रायजिंग स्टार अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नवी मुंबई, नेरूळ येथील फाईव्ह स्टार हॉटेल कोर्टयार्ड मेरिएट येथे २८ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी रेडिओ जॉकी रिया सेनगुप्ता, गायिका तथा अभिनेत्री दिपाली देसाई, टीव्ही 9 च्या संपादिका निखिला म्हात्रे, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, दूरदर्शन केंद्र वरळी मुंबईचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक नवराष्ट्रचे संपादक नरेंद्र कोठारे, न्यूज 18 लोकमतचे न्यूज रीडर तथा मोटिवेशनल स्पीकर विलास बढे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, एबीपी माझाचे रिपोर्टर वैभव परब यांच्यासह राज्यभरातील पत्रकार, व्यावसायिक, उद्योजक, आरोग्य व सेवा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.उत्कृष्ट पत्रकारिता समाजकार्याने  चालणाऱ्या समाजसेवेचा स्वर्गीय नर्सिंग नाईक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ नावाने चालणाऱ्या सॅंस्थेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक सामाजिक ऊपक्रम हाती घेतलेले आहे. स्वस्थ आहार, नियोजन, जीवनशैली  प्रोग्राम इ. च्या माध्यमातून अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेञात,समाजसेवेत आपले संपूर्ण जीवन लोकांच्या गोरगरिबांच्या हितासाठी झटनारे धडाडीचे नेतृत्व  सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या