🌟विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास स्पार्क कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होतो....!


🌟पुर्णेतील अभिनव विद्या विहार शाळेचे माजी मुख्याध्यापक व्यंकटराव तांबे यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : पुर्णा शहरातील न्यू आदर्श कॉलनी या ठिकाणी दि.15 फेब्रुवारी सायंकाळी 05.00 वाजता स्पार्क कोचिंग क्लासेसच्या वर्ग दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भाव पूर्ण निरोप देण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विषयाचे जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्रीकांत हिवाळे स्पार्क कोचिंग क्लासेसला गेल्या अनेक वर्षापासून समर्पित भावनेने शिकविणारे ठाकूर सर मुक्ता कदम ढोणे मॅडम स्पार्क कोचिंग क्लासेस चे संचालक सतीश भारती आदींची उपस्थिती होती.

यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अभिनव विद्या विहार प्रशालेचे माजी मुख्याध्यापक गणित विषयाचे तज्ञ शिक्षक व्यंकटराव तांबे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांचे पहिलं कर्तव्य मन लावून अभ्यास करणे आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवणे गणित इंग्रजी या अवघड विषयाकडे विशेष लक्ष देणे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणे

आदी बाबीवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश संपादन कराव स्पार्क कोचिंग क्लासेस मध्ये ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थिनीचा भरणा जास्त आहे त्यांनी कठोर परिश्रम जिद्द व मेहनतीच्या जोरावर उज्वल यश संपादन करावं व आपल्या शेतकरी कष्टकरी आई वडिलांचे स्वप्न साकार कराव अशा प्रकारचे भावनिक आव्हान त्यांनी केले.राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलचे  इंग्रजी विषयाचेज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्रीकांत हिवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले विद्यार्थी जीवनामध्ये आपण चांगल्या सवयी अंगी का रून खूप अभ्यास करावा वाचन लेखन चिंतन मनन सातत्य पूर्ण करावेस रावानेच प्रत्येक मानव हा परिपूर्ण होत असतो.गुणवत्ता पूर्ण शिक्षणासोबत आपलं चरित्र सुद्धा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थी विद्यार्थिनींनी केला पाहिजे.आई वडील शिक्षक वृंद थोरामोठांचा नेहमीच मानसन्मान केला पाहिजे.

खरच खऱ्या अर्थाने तुमच्या शिक्षणाला अर्थ आहे. यावेळी गजेंद्र सिंग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी उज्वल यश कसं संपादन करावं याविषयी सांगितले. मुक्ता कदम मॅडम यांनी  गणितासारखा अवघड  विषय भरपूर सराव केल्यानंतर गणित विषयांमध्ये आपण पारंगत होऊ शकतो.त्यांनी आपल्या शिकवणीतून सोदाहरण स्पष्ट केले. नागनाथ जनार्धन कदम सर यांनी स्पार्क कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला मनीषा ढोणे मॅडम यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.सर्व मान्यवरांचे पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले.प्रास्ताविक अभिनव विद्या विहार प्रशालेचे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक व स्पार्क कोचिंग क्लासेस चे अर्ध यु शिवप्रसाद भारती सर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले तुम्ही आता उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये जाणार आहात त्या ठिकाणी आपण खूप अभ्यास करून आपलं जे ध्येय आहे ते साध्य करावे.यावेळी वर्ग नववीचे व दहावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हजर होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या