🌟परभणी येथील प्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड.सतीश देशपांडे लिखित ‘राजस्थान एक गौरवशाील इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन...!


🌟मंगळवार दि.06 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन🌟


परभणी (दि.02 फेब्रुवारी) : येथील प्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड.सतिश आबासाहेब देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘राजस्थान एक गौरवशाील इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार 06 फेबु्रवारी रोजी परभणीत होणार आहे.

         वसमत रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 06-00 वाजता पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, हभप माधवराव आजेगांवकर, प्रथम महापौर प्रताप देशमुख, संजय कच्छवे, डॉ. विवेक नावंदर, अ‍ॅड. दीपक देशमुख, प्रमोद वाकोडकर व डॉ. श्रीपाद धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या