🌟डॉ.सदानंद भिसे यांची सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी निवड....!


🌟परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय न्यायवैधकशास्ञ विभाग प्रमुख व प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ.भिसे कार्यरत होते🌟

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय न्यायवैधकशास्ञ विभाग प्रमुख व प्रभारी अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांची सोलापुर डॉ.वेशंपायन वैद्यकिय महाविद्यालय येथे अधिष्ठता पदी निवड करण्यात आली 

गंगाखेड येथील रहिवासी आसलेले डॉ. सदानंद भिसे यांची नुकतीच मुंबई सर जे.जे.वैद्यकीय महाविद्यालय येथून परभणी शासकीय महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली होती याच दरम्यान शासनाने त्यांना पदोन्नती देत त्यांची डॉ.वेशंपायन वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील अधिष्ठाता पदी यांची निवड करण्यात आली त्यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला.डॉ. भिसे यांनी यापूर्वी सर जे.जे शासकीय महाविद्याल मुंबई येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी राज्य अवयव प्रत्यारोपण समिती प्रमुख म्हणून ही काम पाहिले आहे ते हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे सलग 3 वर्ष महाव्यवस्थापकपदी कार्यरत होते.डॉ.भिसे यांचे मुळ गाव गंगाखेड असुन त्यांनी नुतन विद्या मंदिर व डिएससम कॉलेज परभणी येथे शिक्षण घेतले आहे त्यांच्या या निवडी बद्दल शहर वासियांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या