🌟पुर्णा-गौर-नांदेड राज्यमार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना : मोटरसायकल-ॲटोची भिषण धडक....!


🌟गौर गावाजवळ झालेल्या अपघातात चार जन जखमी🌟

पुर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - पुर्णा-गौर-नांदेड राज्यमार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून या मार्गावर सातत्याने अपघात होतांना पाहावयास मिळत असल्याने सदरील मार्गावरील अपघातांची मालिका थांबवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून असाच एक भयंकर अपघात आज सोमवार दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास या मार्गावरील गौर गावाजवळ ऑटोरिक्षा व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने चार जन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 गौर गावालगत झालेल्या या ऑटोरिक्षा व मोटरसायकलच्या जोरदार धडकेत शेख जावेद शेख रशीद वय २४ वर्ष,शेख मुसा शेख बशीर वय २४ वर्ष,शेख जलील शेख पाशा मियां राहणार सर्व पिंपळा भत्या तालुका पुर्णा हे ऑटोरिक्षाने परभणी येथील ऊरूसासाठी निघाले असतांना पुर्णेहून आपल्या मोटरसायकलवर नऱ्हापूर गावाकडे जाणाऱ्या अक्षय शिवाजी अंतरकर वय २२ वर्ष व लहू गंगाराम अंतरकर  यांच्या दुचाकीची व ऑटोरिक्षाची धनगर टाकळी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या गौर गावाजवळ जोरदार धडक झाली यात ऑटोरिक्षातील वरील तिघांसह मोटरसायकल वरील अक्षय अंतरकर हे चौघे जण जखमी झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या