🌟'माझी निवडणूक मी उमेदवार' : सगे सोयरे नाही तर निवडणूक नाही.....!


🌟परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी पाथरीकर भारणार एक हजार उमेदवारी अर्ज🌟

विशेष वृत्त : कार्तिक घुंम्बरे पाटील - पाथरी

परभणी/पाथरी :- मराठा संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार सगे सोयरे नाही तर निवडणूक नाही 'माझी निवडणूक मी उमेदवार' पाथरीकर परभणी लोकसभा मतदारसंघात भारणार एक हजार उमेदवारी अर्ज.


चाटे पिम्पळगांव पटर्न राबवत शहर आणि तालुक्यातून लोकसभा निवडणुकी साठी एक हजार उमेदवारी अर्ज भारणार असल्यामुळे आता निवडणूक आयोगा समोर चिन्ह बायलॉट पेपरवर छापन्याचे नवे आव्हान असणार असल्यामुळे ही निवडणूक होते की चाटे पिम्पळगांव प्रमाणे रद्द होते हे पहाने उचित होणार आहे.

मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील सहा महिन्या पासून आंदोलन करत आहेत.मुंबई येथे आझाद  मैदानवर आंदोलन करण्यासाठी जात असलेल्या जरागे पाटलाना वाशी येथे आडवत मुखमंत्री यांनी सगे सोयरे ची अधिसूचना दिली मात्र यावर अध्यादेश काढला न गेल्याने पाटील पून्हा सतरा दिवस उपोषणाला बसले. 

आता पाटलाच्या आंदोलनाला कोनी  मदत केली यासाठी एस आय टी बसवल्या मुळे आपली फसवनुक झाल्याची भावना मराठा समाजाची झाली असल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत हजारोंच्या संखेत  उमेदवार उभे करुन निवडणुक आयोगा समोर नवा पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सकल मराठा समाज करुन गनिमीकावा करणार असल्याच्या पोस्ट सोशलमीडियावर दिसुन येत आहेत. आशाच प्रकारे प्रत्येक निवडणुकीत करणार असल्याचे मराठा आंदोलक सांगत आहेत.

तालुक्यातील चाटे पिम्पळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.2 मधिल निवडणुकी साठी 155 जन्नानी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु मशीन मध्ये केवळ 65 उमेदवार बसत असल्यामुळे निवडणूक आयोगाने येथील निवडणूक रद्द केली होती. आता हाच फर्मूला लोकसभेला वापरुन निवडणूक आयोगा समोर नवा पेच मराठासमाज निर्माण करण्यासाठी हालचाली करत असल्याचे सोशल मिडिया द्वारे समोर येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या