🌟पालम तालुक्यातील मौजै फरकंडा येथे मराठा आरक्षणासंदर्भात आमरण उपोषण सुरू....!


🌟फरकंडा येथील हनुमान मंदिर परिसर येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०४-०० वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात🌟 

पालम (दि.१३ फेब्रुवारी) - पालम तालुक्यातील फरकंडा येथील सिताराम पौळ यांनी मराठा आरक्षणा संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी फरकंडा येथील हनुमान मंदिर परिसर येथे दिनांक १२ फेब्रुवारी दुपारी चार वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दिनांक १५/० २ / २०२४ रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात सगे सोयरे अधिसूचनेच्या बाजूने निर्णय व्हावा व पालम तालुक्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत.


त्या पूर्णत्त्वात नेण्याकरिता फरकंडा गावातील व तालुक्यातील इतर गावात एकही नोंद सापडलेली नाही याकरता फरकंडा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळो वेळी प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन कुणबी नोंदी संदर्भात आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही त्या करीता मोजे फरकंडा येथील सिताराम मारोतराव पौळ  यांनी तहसीलदार पालम यांना निवेदन देऊन दि १२ पासुन दुपारी चार वाजता हनुमान मंदिर फरकंडा परीसरात अमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत तहसीलदार पालम यांना निवेदन देण्यात आले 

यावेळी पालम तालुका अध्यक्ष प्रकाशराव कोकाटे, कार्याध्यक्ष रामराव शिंदे,गोविंदराव पौळ,रामभाऊ पौळ,विलासराव पौळ, किशनराव पोळ,दुलाजी पोळ,परसराम पौळ,नागनाथ पौळ,माणिक पौळ,रामजी देशमुख, माणिकराव कुरे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या