🌟'निर्भय बनो' टिममधील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सहित इतरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध....!


🌟घटनेतील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निवेदनाद्वारे मागणी🌟 

 परभणी : पुणे येथे काल शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी २०२४ 'निर्भय बनो' टीम कडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ऍड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे प्रसिद्ध वक्ते बोलणार होते. त्या कार्यक्रमाला जात असताना वाटेत आरएसएस व भाजपाच्या लोकांनी त्यांना अडवून गाडीची तोडफोड करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेचा परभणी जिल्हा डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून घटनेतील हल्लेखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी याकरिता जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देखील देण्यात आले.


डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सन २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यापासून संघ-भाजपाचा अजेंडा राबवित अशा प्रकारचा हिंसाचार वाढवल्याचे दिसून येते. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे,कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांना जास्त दिवस झालेले नाहीत आणि अशातच विचारवंत,लेखक,सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकरांवर हल्ले वाढलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून कालचा हल्ला आपण पाहू शकतो या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

        या हल्ल्यातील आरएसएस/भाजपा तसेच इतर संबंधित गुन्हेगारांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्रालयाकडे करण्यात आली असून या निवेदनावर नसीर शेख,जय एंगडे,सुबोध खंदारे,भूषण भुजबळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या