🌟पालम तालुक्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिलेला शब्द पाळला....!


🌟मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले उपोषणकर्ते सिताराम पौळ यांची प्रतिक्रिया🌟

पालम (दि.१६ फेब्रुवारी) - पालम तहसिलचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी आज शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी मौजे.फरकंडा नगरीला भेट देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना दिलेला शब्द पाळला आणि उपोषणकर्ते सिताराम मारोतराव पौळ गुरुजी यांची पालम तहसीलदार यांच्यासोबत तालुक्यातील नोंदी बाबत चर्चा झाली.

यावेळी बोलतांना सिताराम पौळ म्हणाले या अगोदर वेळोवेळी तहसीलदारांना भेटलो असता तहसीलदार यानी थांबा गुरुजी गडबड करू नका आपल्या फरकंडा गावाची नोंद काढून देतो असा दिलेला शब्द आज तहसिलदार यांनी पूर्ण करून आमच्या येथील मराठा कुणबी नावानिशी एक प्रमाणपत्र आमच्या गावचे रहिवासी प्रसाद सखाहारी पौळ यांना प्रमाणपत्र दिले दिलेला शब्द तालुका दंडाधिकारी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी पूर्ण केला आहे त्यांचे उपोषण करते सिताराम पौळ मी गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या