🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.20 फेब्रुवारी) : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

🌟परभणी जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन....!


आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या