🌟सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुर्णेत उत्स्फूर्त प्रतिसाद.....!


🌟पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने ठेवली आपली व्यवसायिक प्रतिष्ठाण बंद🌟


पुर्णा (१४ फेब्रुवारी) - मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच दि.१५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत असलेल्या विधी मंडळ अधिवेशनात सगे सोयरे अधिसूचनेचा मसूदा पटलावर ठेऊन त्यांचा कायदा पारित करुन घ्यावा या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले 'मराठा योध्दा' मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या महाराष्ट्र बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपापली व्यवसायिक प्रतिष्ठाण कडकडीत बंद ठेवून भरघोस पाठिंबा दिला.


पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंट परिसर,बसस्थानक परिसर,नवा मोंढा परिसर कृषी उत्पन्न बाजार,बसस्थानक रोड,रेल्वे स्थानक परिसर,डॉ जाकीर हुसेन चौक परिसर,महावीर नगर परिसर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर,महात्मा बसवेश्वर चौक परिसर,भाजी मंडई परिसर,जुना मोंढा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर,स्वामी दयानंद सरस्वती चौक परिसर, लोकमान्य टिळक रोड परिसर,सराफा बाजार परिसर आदी परिसरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपापली व्यवसायिक प्रतिष्ठाण कडकडीत बंद ठेवून बंदला भरघोस पाठिंबा दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी बांधवांचे आभार मानले यावेळी पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी शहरासह संपूर्ण तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवल्याचे निदर्शनास आले एकंदरीत पुर्णा शहरासह तालुक्यातील ताडकळस,कावलगाव,चुडावा,झिरो फाटा,वजूर आदी ठिकाणच्या व्यापारपेठा देखील कडकडीत बंद होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या