🌟प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय : अन्य प्रकरणातही शिक्षा🌟
परभणी (दि.05 फेब्रुवारी) : दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याबद्दल सय्यद अन्सार सय्यद सईद (रा. अब्दुल रहिम नगर) या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम. नंदेश्वर यांनी सोमवार 5 फेबु्रवारी रोजी कलम 6 पोक्सो अन्वये जन्मठेप, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, भादंवि कलम 263 अन्वये पाच वर्षे कैद, 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद व कलम 506 अन्वये 5 वर्षे कैद, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलास सय्यद अन्सार सय्यद सईद याने दगड मारुन जखमी केले व उपचार करण्याच्या बहाण्याने त्यास सरकारी दवाखानामार्गे दर्गाह रस्त्यावरील कालव्याकडे नेले. कालव्याकडील पूलाजवळ तसेच तेथीलच एका टीनशेडच्या बाजूला असणार्या स्वच्छतागृहात अनैसर्गिक अत्याचार केला. त्याभागात राहणार्या एका महिलेने मुलाच्या ओरडण्यावरुन त्याठिकाणी धाव घेतली, त्यावेळी तीने आरोपी पिडीतावर अत्याचार करत होता, हे पाहिले. तेव्हा त्या महिलेने त्या आरोपीस मारहाण केली. इतर नागरीकांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात संबंधित मुलाची, आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. दोघांच्या गुप्तांगावर आढळून आलेल्या जखमा, कपड्यावरील रक्त तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठविले. पोलिस निरीक्षक शरद जराड यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल विशाल गायकवाड यांच्या मदतीने तपास करीत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. एकूण 10 साक्षीदार, त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पिडीत मुलगा व सोडविणारी महिला यांची साक्ष, घटनास्थळावरुन जप्त केलेल्या तेलाच्या बॉटलीसह शर्टवरील रक्ताचे नमूने वगैरे गोष्टींचे अहवाल सूनावनी दरम्यान सादर केल्यानंतर डीएनएच्या अहवालात ते रक्त पिडीताचेच असल्याचे सिध्द झाल्यानंतर न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषक यांची साक्ष ग्राह्य धरुन संबंधित आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. अभिलाषा पाचपोर यांनी त्यांना मदत केली. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी टोटेवाड, संतोष सानप, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार शंभुदेव कातकडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी या प्रकरणात काम पाहिले.....
0 टिप्पण्या