🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाच्या तपासकामी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षकांची पुर्णेला भेट...!


🌟महाराष्ट्र पोलीस तपासात सहकार्य करीत नसल्याचा महानिरीक्षक आरोमासिंह ठाकुर यांचा गंभीर आरोप🌟 


पुर्णा (दि.१८ फेब्रुवारी) - पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील लाखों रुपयांच्या रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाच्या तपासा संदर्भात आज रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी ११-३० वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर यांनी पुर्णा जंक्शन स्थानक परिसरातील डिझेल डेपोला भेट दिली यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात त्यांनी गुन्ह्याच्या तपासाचा देखील आढावा घेतला. 


यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह म्हणाल्या की दि.०७ फेब्रुवारी २०२४ पासून रेल्वे डिझेल डेपोचे खाजगीकरण झाले असून सदरील डिझेल डेपो रिलायन्स कंपनीच्या ताब्यात देण्यात आला आहे डिझेल चोरी प्रकरण दि.२९ जानेवारी २०२४ रोजी घडले असून या घटनेतील ०५ आरोपींसह ३० लाख रुपयांचा मुद्देमाल रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतला आहे सदरील गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देणार काय ? असा प्रश्न प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पोलिस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर म्हणाल्या की गुन्ह्याची व्याप्ती पाहता सीबीआयकडे तपास दिला जात असतो सदरील गुन्ह्यात केवळ ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही.सदरील घटनेचा तपास आता रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षकांसह स्थानिकांकडे नसल्याचे देखील यावेळी पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर म्हणाल्या यावेळी पुढे बोलतांना आरोमासिंह यांनी स्थानिक महाराष्ट्र पोलीस तपासात सहकार्य करीत नसल्याचा गंभीर आरोप केला यावेळी त्यांनी असेही संकेत दिले की घटनेतील आरोपींच्या मालमत्तेची सखोल चौकशी होणार.

दरम्यान या डिझेल चोरी प्रकरणातील फरार आरोपी टँकर मालक संतोष पवार राहणार वाटूर फाटा परतूर जिल्हा जालना व इंडियन ऑईल पेट्रोल पंप मॅनेजर रामचंद्र यादव राहणार वाटूर फाटा परतूर जिल्हा जालना या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेऊन रेल्वे न्यायालय औरंगाबाद यांचे समोर हजर केले असल्याचे समजते या गुन्ह्यातील आरोपी टँकर मालक संतोष पवार यांच्या मालकीचे जवळपास वीस/बावीस डिझेल टँकर असल्याचे समजते पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोला सातत्याने त्याच्या डिझेल टँकरद्वारे डिझेलचा पुरवठा केला जातो दि.२९ जानेवारी २०२३ रोजी स्थानिक गुन्हें शाखा परभणीच्या पथकाने दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून ताब्यात घेतलेल्या डिझेल टँकर क्रमांक क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ सह आरोपी संतोष पवार याच्या मालकीच्या टँकरद्वारे पुर्णेतील डिझेल डेपोला डिझेल पुरवठा करण्यात आला याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने सदरील गुन्ह्यावर जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचे काम सोईस्कर रित्या केले जात असून कोट्यावधी रुपयांच्या महाघोटाळ्याचे रुपांतर केवळ काही लाखांत करुन महाघोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या रेल्वे डिझेल घोटाळ्यातील महत्वाचा आरोप कार्यालय अधीक्षक मोहम्मद इस्लआऊद्दईन उर्फ मोबीन याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी फेटाळल्यानंतर देखील तो अद्यापही रेल्वे सुरक्षा बलाच्या हातावर तुरी देऊन फरारीत स्वतःच्या बचावासाठी हातपाय मारत भटकत असल्याने या रेल्वे डिझेल घोटाळ्याच्या व्याप्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या