🌟नांदेड गुरुद्वारा बोर्डावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया पुढे १४ दिवसांपासून चक्री उपोषण....!


🌟जिल्हाधिकाऱ्यांचा चौदाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांना अजब सल्ला : प्रशासनाच्या कार्यप्रणाली आंदोलकांची नाराजी🌟


नांदेड (दिल.२२ फेब्रुवारी) - महाराष्ट्र राज्य सरकारने पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 च्या विरोधातील सिख बांधवांच्या संदेश शासनाला कळवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याऐवजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन कायद्या विरोधात मागील चौदा दिवसांपासून आदोलन करणाऱ्या आंदोलनकारी सिख बांधवांना मुख्यमंत्र्यांच्या समाज माध्यमावरील प्रतिक्रियांवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्याने आंदोलनकर्त्यांनी याबाबत तीव्र खेद व्यक्त केला आहे. 


   जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड अॅक्ट 1956 बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज चौदावा दिवशी गुरुद्वारा माता साहेबचे जथेदार तेजासिंग तसेच नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे यांनी भेट दिली असून आजचे उपोषणकर्ते स. जगदीपसिंग नंबरदार, मनिंदरसिंग रामगडिया, गुरमीतसिंग बेदी , भोलासिंग गाडीवाले, हजुरासिंग शाहू, अमरजीतसिंग महाजन, शेरसिंग पुजारी, जसबीरसिंग बुगंई यानी उपोषण केले तर त्यांना शेरसिंघ फौजी, गुरमीतसिंग महाजन, स. मनप्रीतसिंग कुंजीवाले,रविंद्रसिंघ बुंगई, मनबीरसिंघ ग्रंथि , दीपकसिंघ गल्लीवाले स.राजेंद्रसिंग पुजारी, जर्नलसिंग गाडीवाले, करणसिंघ लोनिवाले , रवींद्रसिंग पूजारी, कृपालसिंग हजुरिया, सिमरंजीतसिंग कुंजीवाले, हरभजनसिंघ पुजारी  दीपकसिंघ हजूरिया, बीरेंद्रसिंघ बेदी, महेन्दरसिंघ पैदल, सुरेंद्रसिंग मेंबर , जसपालसिंग लांगरी, अवतारसिंग पहरेदार , गुरप्रितसिंग सोखी, मंनप्रीतसिंग कारागीर, सुखविंदरसिंग हुदल, इंदर सिंग शाहू, गुरुदीपसिंघ संधू, अमरजीतसिंग कुंजीवाले, जगजीतसिंग खालसा आदींनी जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला आजच्या आंदोलनाला करीमनगरचे माजी महापौर रविंद्रसिंग, मंजीतसिंग कॉन्ट्रॅक्टर,बिशणसिंग, यशपालसिंग, सवर्णसिंग, बलबीरसिंग,महेंद्रसिंग,मंदिरसिंग तसेच नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आशिष गोधमगावकर,ॲड.संजय वाकोडे , ॲड. सूरेंद्रसिंग लोणीवाले,ॲड.अमोल वाघ,ॲड.मारुती बादलगावकर यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या