🌟गंगाखेड येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.....!


🌟या प्रसंगी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟 

गंगाखेड : शहराचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत रविदास महाराज यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते, माजी सरपंच नारायण घनवटे, किसान संघाचे अध्यक्ष माधवराव चव्हाण आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. 

भगवती मंदिरासमोरील छोटेखानी कार्यक्रमात संत रविदासजी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. राजू वाघमारे, विजय वानखेडे, दीपक वाघमारे, मंगेश वाघमारे, दत्ता टोंपे, श्यामराव भडादे, मुस्लीम ओबीसी परिषदेचे ईश्त्याक अन्सारी, विनोद वाघमारे, समता परिषदेचे शहराध्यक्ष  दिगंबर यादव, नामदेव वाघमारे, संतोष इरकर, कैलास कांबळे, कैलास गंगासागरे, सखाराम इरकर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंती निमित्त अभिवादन केले. सर्वच महापुरषांच्या जयंत्या मुख्य चौकात साजरी करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या