🌟पुर्णेचे नुतन डिवायएसपी समाधान पाटील व पो.नि.विलास गोबाळे यांच्याकडे संवेदनशील तालुक्याची आव्हानात्मक जवाबदारी...!


🌟तालुक्यातील गौण खनिज तस्कर व माफियांसह झुंड/गुंडशाही विरोधात कठोर कारवाईची जनसामान्यांकडून अपेक्षा🌟 

परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) - मराठवाड्यातील विकासात्मक वाटचालीत सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील परंतु कधीकाळी तिन/चार दशकांपूर्वी सर्वात सधन तालुका म्हणून शासकीय दप्तरी नोंद असलेल्या पुर्णा तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीला कायमस्वरूपी टाच लावण्याचे काम सोईस्कर रित्या करण्याचे काम असंतुष्ट राजकीय दुष्ट आत्म्यानी वेळोवेळी केले कृषीक्षेत्र/औद्योगिक क्षेत्र/व्यापार क्षेत्र/शैक्षणिक क्षेत्रासह रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन असलेल्या या पुर्णा तालुक्याची आज अतिसंवेदनशील व वादग्रस्त तालुका म्हणून शासकीय दप्तरी नोंद करण्याची का वेळ आली असावी या विषयावर प्रशासनासह पोलीस प्रशासनाला देखील एकवेळ सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता निश्चितच भासणारच आहे.

'जगात जर्मनी भारतात परभणी....परभणीत एकमेव पूर्णा अन् या पूर्णेत मुक्तपणे संपूर्ण स्वातंत्र्यात वावरत वाटेल ते गिळायला तत्वभ्रष्ट राजकारणी भ्रष्ट नौकरशहा आणि तस्कर माफियांना काहीही पुरणा' एकंदर अशी अवस्था या तालुक्याची होतांना पाहावयास मिळत आहे देश/राज्यातच नव्हें तर जगाच्या पाठीवर कुठेही एखादी घटना घडली तरी त्या घटनेचे पडसाद पुर्णेत उमटले नाही तर नवलच म्हणावें लागेल ? येथील सर्वधर्मीय सामान्य जनता अत्यंत शांतताप्रिय व प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करणारी असली तरीही येथील विघ्नसंतोषी समाजघातकी प्रवृत्ती पडद्यामागील कुटील कारस्थानी तत्वभ्रष्ट राजकीय शकुनी प्रवृत्ती शहरासह तालुक्याला लागलेला अतिसंदनशीलतेचा कलंक कद्दापी संपुष्टात येऊ देणार नाही कारण हा कलंक पुसला गेला तर या शहरासह तालुक्यावर स्वज्वळपणाचा आव आणून अधिराज्य गाजवणाऱ्या आधुनिक शकुनींचे अनैतिक व्यवसायांसह दलालीचे उद्योग धंदे आणि संत्ताप्राप्तीचे स्वप्न दुभंगणार नाही का ? हा प्रश्न कायम राहणार.

पुर्णा-गोदावरी नदीकाठावर बसलेल्या पुर्णा तालुक्यातील कृषी क्षेत्र कधीकाळी संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर होते गहू,टाळकी ज्वारी,हरभरा,कापूस,ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते परंतु या पिकांच्या जागेवर आता गौण खनिज रेती मुरुम माती दगड खडीने घेतल्याचे निदर्शनास येत असून याचा सर्वात जास्त दुष्परिणाम कृषी उद्योगावर झाल्याचे दिसत असून कधीकाळी तालुक्यातील रस्त्यांवरुन शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या ट्रॅक्टर आता अदृश्य होऊन त्यांच्या जागेवर या रस्त्यावर रात्रंदिवस अवैध चोरट्या गौण खनिज रेती माती दगड खडीची प्रचंड प्रमाणात वाहतूक करणारे टिप्पर/हायला/ट्रक धावतांना पहावयास मिळत असून त्यामुळे या तालुक्यातील नद्या नाल्यांसह ओढ्यांतील पाण्याचा स्त्रोत संपूर्णतः संपुष्टात आल्याने परिसरातील शेती उद्योगाची वाट लागल्याचे पाहावयास मिळत आहे.

पुर्णा शहरासह तालुक्यात किरकोळ वादातून वेळोवेळी उद्भवणारी दंगलसदृश परिस्थिती तसेच मित्र मंडळांनी हळुवारपणे घेतलेले सशस्त्र टोळक्यांचे स्वरुप व सातत्याने या टोळ्यांना पडद्यामागील राजकीय दडपशहांकडून मिळवणारे खतपाणी या सर्व बाबींचा देखील येथील व्यापार/उद्योग क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाल्यामुळे अनेक दिग्गज उद्योजकांनी पुर्णेतून काढता पाय घेत आपले उद्योग व्यापार इतर जिल्ह्यात थाटल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा तालुक्यात एकंदर ९४ गाव खेड्यांचा समावेश असतांना देखील यातील जवळपास ७५ टक्के ग्रामस्थांनी या भयावह परिस्थिती मुळे पुर्णेतील व्यापारपेठे कडे पाठ फिरवल्याने शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांवर अक्षरशः माश्या मारण्याची वेळ आल्याचे पाहावयास मिळत असून शहरासह तालुक्यातील चांगले व्यापार धंदे अदृश्य होत असून त्यांची जागा अवैध व्यवसायांनी घेतल्याचे पाहावयास मिळत असून मोठ्या प्रमाणात वाढती बेरोजगारी देखील यास कारणीभूत ठरत आहे.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक मराठवाड्यातील निजामकालीन सर्वात मोठे जंक्शन तिन/चार दशकांपूर्वी असंख्य प्रवासी गाड्यांसह मालवाहतूक रेल्वे गाड्यांची या स्थानकांवरुन वाहतूक होत असे तसेच पाच ते साडेपाच हजार रेल्वे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते या पुर्णा जंक्शन परिसरात अनेक महत्वाची सुसज्ज रेल्वे कार्यालय व कर्मचारी वसाहत शेंकडों एक्कर जमीन पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांसह जिल्ह्यातील अकार्यक्षम संधीसाधू लोकप्रतिनिधींच्या 'आंधळ दळत अन् कुत्र पिठ खात' या नितीमत्तेमुळे या पुर्णा जंक्शन स्थानक व परिसराची अवस्था शेवटी भयान जंगलात होऊन या भयाण जंगलात शेवटी मनुष्यरुपी हिंस्र पशूंचा मुक्त संचार होतांना दिसत असून डिझेलसह रेल्वे संपत्ती चोर,पाकीटमार मोबाईल चोर महिलांच्या दागिन्यांवर प्रवासी वर्गाच्या बॅगांवर हात मागणारे अट्टल गुन्हेगार एखाद्या नंदनवनात फिरल्यागत या ठिकाणी मुक्त संचार करतांना पहावयास मिळत असून विविध राज्यातून रेल्वे मार्गाने पुर्णेत दाखल होणारे अट्टल गुन्हेगार एक दिवस पोलिस प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही त्यामुळे पुर्णेत नव्याने रुजू झालेले तरुण तडफदार उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांना आव्हानात्मक जवाबदारी पार पाडीत कायदा व सुव्यवस्था हाताळावी लागणार असल्याने या दोन्ही सन्माननीय अधिकाऱ्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या शतशः हार्दिक शुभेच्छा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या