🌟परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील खोरस येथील जवान नवनाथ सोंड राजस्थान येथे शहीद.....!


🌟सदर घटनेमुळे पालम तालुक्यात सर्वत्र शोककळा परसली आहे🌟

भारतमातेची 12 वर्ष सेवा बजावलेले जवान नवनाथ सोंड (वय 32) यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता विरगती प्राप्त झाली. ती बाडनेरा (राज्यस्थान) येथे. ते 2011 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. तदनंतर त्यांनी मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, जम्मू व काश्मीर आदी ठिकाणी सेवा बजावली होती. माणूसकी जपणारा त्यांचा सुस्वभाव होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे. सदर घटनेमुळे पालम तालुक्यात शोककळा परसली आहे. 

* अत्यंत खडतर प्रवासातून सैन्य दलात रुजू :-

वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. तेव्हा कुटुंबाचा संपूर्ण भार आईवर आला. त्यात आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. मोजून दीड एकरवर शेती, आणि त्यावरच त्यांची उपजीविका होती. मग आईने हाडाचे पाणी करून नवनाथ यांना शिकवले. त्यांनीही मोठ्या कष्टाने तयारी करून देश सेवेत जाण्याचा निर्धार केला. अत्यंत खडतर प्रवास करून ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. पुढे त्यांनी कौटुंबिक परिस्थितीला सुधारण्यासाठी हातभार लावला. आता कोठे चांगले दिवस आले होते, ते काळाला मान्य झाले नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या