🌟पुर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर/सुकी पिंपळगाव शासकीय वाळू विक्री डिपोसह पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर वाळू तस्करांचा धुमाकूळ.....!

 


🌟पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर जणू वाळू तस्कर/माफियांचे लागले कुळ : हजारो ब्रास वाळूचे जेसीबी यंत्राने उत्खनन🌟


🌟महसूल प्रशासनाने लक्ष्मीनगर परिसरातील नदीपात्रातून पकडली तब्बल सात अवैध वाळू वाहतूक करणारी वाहन🌟

पुर्णा (दि.१० फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील एकमेव लक्ष्मीनगर/सुकी पिंपळगाव शासकीय वाळू विक्री डिपो परिसरासह तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर वाळू तस्करांचा धुमाकूळ अन् पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर जणू वाळू तस्कर/माफियांचे लागले कुळ एकंदर अशी विचित्र अवस्था तहसिलदार माधवराव बोथीकर महसूल प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे झाल्याचे निदर्शनास येत असून तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी तहसिलदार पदाचा पदभार स्विकारल्यानंतर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाळूसह अवैध मुरुम,दगड खडी,माती अवैध उत्खननासह तस्करीला लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु त्यात मोठ्या प्रमाणात वाढच झाल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णेचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बोथीकर यांनी पुर्णेत रुजू झाल्यानंतर मागील वर्षी १७ मार्च २०२३ रोजी कान्हेगाव येथील पुर्णा नदीपात्रावर हातात ऊसाचा कांडा घेऊन धडक गोड कारवाई करीत तब्बल तिन तराफे जाळण्याची धाडसी कारवाई करीत अवैध वाळू उत्खननासह तस्करी करणाऱ्या तस्करांना इशारा तर दिला परंतु त्यानंतर मात्र अवैध वाळू तस्करांच्या विरोधात अशी कुठलीही ठोस कारवाई केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे मागील जवळपास वर्षभरापासून वाळू तस्करांनी पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर कुळ लागल्या प्रमाणे अक्षरशः या नद्यांची पात्र जेसीबी/सेक्शन पंपांसह वाळू उपसा करणाऱ्या अंतराज्यातील असंख्य कामगार टोळ्यांच्या मार्फत प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करीत अक्षरशः या पुर्णा-गोदावरी नद्यांचे पात्र ओरबाडून काढीत असंख्य वाहनांसह शेंकडों गाढवांच्या आधारे वाळू तस्करीला राजरोसपणे रात्रंदिवस सुरुवात केल्याने याचा सर्वात मोठा परिणाम शेती उद्योगावर झाल्याचे निदर्शनास येत आहे.


(पुर्णेत रुजू होताच तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी १७ मार्च २०२३ रोजी कान्हेगाव येथील पुर्णा नदीपात्रावर तिन तराफे जाळली)

पुर्णेतील महसूल प्रशासनात काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तरुण तडफदार नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी अवैध वाळू उत्खननासह अवैध वाळू तस्करी विरोधात कारवायांना सुरुवात केल्याने तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये अक्षरशः गोंधळ माजला असून काल शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६-३० ते ०७-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एकमेव शासकीय वाळू विक्री डिपो लक्ष्मीनगर/सुकी पिंपळगाव येथील पुर्णा नदीपात्रातून बेकायदेशीर उत्खनन करुन चोरट्या वाळूची वाहतूक करणारी तब्बल सात टिप्पर तहसिलदार बोथीकर व महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाने लक्ष्मीनगर पाटी परिसरातून ताब्यात घेतली असून यात एम.एच.२७ बीएक्स ७१३५,एम.एच.२२ एन १५५५,एम.एच.०४ डिके ०२६६,एम.एच.२२ एए ९११,एम.एच.३६ -१८२७,एम.एच.२७ बीएक्स ६३१६,एम.एच.२२ एए ००११ ही सात वाळूने भरलेली वाहन ताब्यात घेतली असून या वाहनांना प्रति वाहन १ लाख ७५ हजार रूपये प्रमाणे तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनातील सुत्रांकडून समजते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या