🌟परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या 'गाव चलो' अभियानात कार्यकर्ते झाले दंग....!


🌟शहरासह ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेते मंडळी पदाधिकारी,कार्यकर्ते वार्डांसह गावोगाव अभियान राबविण्यात दंग🌟

परभणी (दि.10 फेब्रुवारी) : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या दहा वर्षातील विकास कामांसह महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय विविध क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचावेत यादृष्टीकोनातून  भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या गाव चलो अभियानाच्या निमित्ताने या जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्ते वार्डांसह गावोगाव अभियान राबविण्यात दंग आहेत.

         परभणी महानगरासह जिल्ह्यातील चार मतदारसंघांतर्गत नऊही तालुक्यात हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. त्या निमित्ताने भक्कम असे नियोजन केल्या गेले असून त्याप्रमाणे 4 ते 11 फेबु्रवारी या दरम्यान हे पदाधिकारी व कार्यकर्ते ठरवून दिलेल्या भागांमधून, क्षेत्रांमधून प्रत्येक बुथवरील नागरीकांशी संवाद साधत आहेत.

         परभणी विधानसभा मतदारसंघ प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी झरी या बड्या ग्रामपंचायतीत व्यापार्‍यांसह सर्व स्थानिक मतदारांबरोबर थेट संपर्क साधून हितगूज केले. ग्रामस्थ, माजी सैनिक, आशा अंगणवाडी सेविका, महिला बचतगट सदस्या, विविध योजनांतर्गत लाभार्थी, व्यापारी, विक्रेते, नव मतदार यांच्या बरोबर संपर्क साधून राज्य व केंद्र सरकारने राबविलेल्या उपक्रमांची पत्रकाद्वारे माहिती दिली. तसेच प्रवासी कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी एक दिवस राहुन समस्यांही ऐकून घेतल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या