🌟शिक्षकांनी शिक्षणा सोबत मार्गदर्शन करावे - रश्मीताई खांडेकर

      


🌟माखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या संत्कारावेळी त्या म्हणाल्या🌟   


    
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव आवरगंड (अध्यक्ष शाळा व्यवस्थान समिती) प्रमुख पाहुणे श्रीमती रश्मीताई खांडेकर सिओ.(प्रकल्प अधिकारी,जि प परभणी) मारोती मोहिते (आमदार गुट्टे मिकाका.मीत्र मंडळ,तालुकाध्यक्ष) गोविंद आवरगंड (सरपंच,माखणी)  सचिन आवरगंड (जिल्हाध्यक्ष, स्वराज्य संघटना)  बाबूराव. आवरगंड ( चेरमन) अशोक आवरगंड नेमाजी. गाडे.विशेष अतिथी  जनार्धन आवरगंड (प्रगतिशील शेतकरी तथा पत्रकार आणि नवनियुक्त  आखील अध्यक्ष ग्राहक मंच पूर्णा तालुका अध्यक्ष) बंडूभाऊ गाडे (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थान समिती) अनुरथ आवरगंड, मोतीराम आवरगंड,नागनाथ नवघरे, संतोष अंभूरे (सर्वजण शाळा व्यवस्थापन समिती,सदस्य) शिक्षण प्रेमी  विष्णु आवरगंड, इत्यादी 

.       या वेळी एनएमएमएस परीक्षेतील 11 विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षक सुनील शेळके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला करण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता 03 री तील विध्यार्थिनी कु तेजस्विनी आवरगंड हिचे भाषण झाले आणि तिने शाळेतील अध्यापनाचा सर्व आढावा सांगितला.जनार्धन आवरगंड यांनी अनमोल असे मनोगत केले. यानंतर  श्रीमती रश्मीताई खांडेकर मॅडम यांनी एनएमएमएस मध्ये प्राविण्य मिळवलेल्या सर्व मुलांचे आणि मार्गदर्शक शिक्षक सुनील  शेळके .यांचे कौतुक केले आणि जनार्धन आवरगंड यांच्या कामाचे विशेष कौतूक करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दै लोकमतचे पत्रकार. गजानन नाइकवाडे व दै.सकाळचे पत्रकार शिवाजी शिराळे यांची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  संजयकुमार जोशी यांनी केले.तर.सुत्रसंचलन ढगे यांनी तर आभार प्रदर्शन सुरज पौळ. यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सारंग संगवे  सौ. आश्विनी शहाणे.  गीतांजली आवरगंड अंगणवाडी सेविका .शाळा व्यवस्थापन समिती शिवाजी वर्ग बंडू गाडे.अनुरथ आवरगंड  गोविंद पौळ गोविंद पलमपली. कल्याण आवरगंड. आदींनी परिश्रम घेतले.....

 .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या