🌟मासिक पाळीचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास शारीरिक व मानसिक त्रासातून मुक्तता - डॉ.भारती मढवई-येवलीकर


🌟पुर्णा तालुक्यातील छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन येथे 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळेत त्या बोलत होत्या🌟

पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - किशोर वयीन मुलींनी मासिक पाळीला न घाबरता त्याबद्दलचे गैरसमज दूर करून मासिक पाळीचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास शारीरिक व मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल  असे प्रतिपादन डॉक्टर भारती  मढवई-येवलीकर यांनी केले.

पुर्णा तालुक्यातील छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन येथे 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळेत त्या बोलत होत्या यावेळी डॉक्टर  सुजित येवलीकर,डॉक्टर समिहर  खांडरे,डॉक्टर कांबळे,सह शिक्षिका कांता जाधव व आश्विनी भोसले उपस्थित होत्या या वेळी इयत्ता नववी व दहावीच्या दोनशे मुलींची तपासणी करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या