🌟नांदेड जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीकडून दोन राज्यसभेचे खासदार.....!

🌟राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह डॉ.अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी🌟 

नांदेड : नांदेड जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीकडून दोन राज्यसभेचे खासदार मिळणार असून कॉंग्रेस पक्षातून नेमकेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीत मागील दशकभरापासून कार्यरत असलेले डॉ.अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

 महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेडचे डॉ.अजित गोपछडे व पुण्याच्या माजी आमदार मेघाताई कुलकर्णी या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात अस्तित्वहीन झालेल्या भारतीय जनता पार्टीला बळ प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने भाजपा नेतृत्वाकडून एखाद्या निष्ठावंताला उमेदवारी बहाल करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ही अपेक्षा फोल ठरल्याने पुन्हा एकदा परभणी जिल्ह्याच्या वाट्याला कायमस्वरूपी उपेक्षाच आल्याचे निदर्शनास येत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या