🌟परभणी जिल्हा नेहरु युवा केंद्रामार्फत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन....!


🌟या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख निवडणुक विभागाचे दत्ता गिणगिणे तर म्हणून नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांची उपस्थिती🌟
 


परभणी (दि.27 फेब्रुवारी)
: युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र परभणी यांच्या वतीने दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे लाभलेले निवडणुक विभागाचे दत्ता गिणगिणे, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, उपप्राचार्या डॉ. संगीता अवचार, जिल्हा युवा अधिकारी शशांक रावुला आणि अरुण पडघन या सर्वांनी दीप प्रज्वलित करुन प्रतिमेचे पूजन केले. 

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. स्वागत गीत आणि मतदार जनजागृती गीत हे लोककला मंच शाहीर उबाळे आणि त्यांच्या संचाने गायले. या गीतातील प्रत्येक ओळींतून मतदार जागृती आणि मतदाराचे कर्तव्य याची प्रकर्षाने जाणीव करुन देण्यात येत होती.तसेच प्रमुख पाहुणे दत्ता गिणगिणे यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रणालीचे मार्गदर्शन केले. तर कर्मचारी दिनेश यांनी पीपीटी सादरीकरण द्वारे ऑनलाईन मतदार नोंदणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. संगीता अवचार यांनी केले.


कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा युवा अधिकारी शशांक रावुला यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. नसीम बेगम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा सेना कु. प्रियंका खुणे, रघुनाथ शिंदे आणि महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अरुण पडघन आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या