🌟पुर्णेतील स्वा.सै. सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांची उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य म्हणून निवड...!


🌟 प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांना या अगोदर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार देखील मिळाला आहे🌟

पूर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांची उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र "करियर कट्टा" महाविद्यालयीन स्पर्धा २०२३-२४ चा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये परभणी जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ रामेश्वर पवार यांची निवड घोषित करण्यात आली आहे.


डॉ रामेश्वर पवार यांना या अगोदर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला असून त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच्याहत्तर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.युजीसीचा एक लघुशोध प्रकल्प पूर्ण केला आहे तर बारा ग्रंथ प्रकाशित केले आहेत . महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथालय नियोजन समिती, ग्रंथ निवड समिती अशा विविध समित्यांवर कार्य केले आहे.ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्यापरिषद व अधिसभा सदस्य म्हणून कार्य करत आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या