🌟छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रयत महोत्सवाचे आयोजन....!


 🌟रयत बहुऊद्देशिय सेवाभावी संस्थेचा ऊपक्रम : महोत्सवात युवक,युवती,पुरुष,महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन🌟

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रयत बहुऊद्येशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने दि.01फेब्रुवारी ते दि.29 फेब्रुवारी 2024 हा संपुर्ण महिनाभर संस्थेच्या वतीने रयत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असुन या महोत्सवात युवक,युवती,पुरुष,महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे 

महोत्सवाच्या माध्यमातुन गावागावात आर्थिकसाक्षरता बेरोजगार युवक युवती साठी रोजगार व स्वंयरोजगाराविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असुन या संधीचा समाजातील गरजु व होतकरु युवकांनी घ्यावा या बरोबरच आपण कष्टाने कमवलेल्या पैशाचे नियोजन कसे करावे याविषयी गावागावात आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करुन लोकांना आर्थिक नियोजन,बचतआणि गुंतवणुक,विमा,सुकन्या समृध्दी योजना पेन्शन आदी विषयावर या रयत महोत्सवातुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी या महोत्सवाचा अधिकआधिक लोकांनी फायदा घ्यावा असे आव्हाण संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्वाती सुरवसे,सामाजिक कार्यकर्ये गजानन सुरवसे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या