🌟वाशिम येथील बेवारस मनोरुग्ण युवकाच्या मृतदेहावर तेजस्वीनी महिला बहुउद्देशीय संस्थेने केले अंतीम संस्कार...!


🌟त्याच्या निधनानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष कविता सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्कार🌟 

फुलचंद भगत

वाशिम  : वाशिम येथील सुपखेला फाट्यावर असलेल्या तेजस्वीनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या आपले घर मनोरुग्ण आश्रमामध्ये संचालीका कविता सवाई यांच्या नेतृत्वात बेघर निवारा केंद्रात मनोरुग्ण महिला व पुरुषांचे उपचार व पालण पोषण केल्या जात आहे. या ठिकाणी अनेक मनोरुग्ण हे पूर्णपणे दुरुस्त झाले असून, त्यांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी या केंद्रामध्ये एक मनोरुग्ण युवक दाखल झाला होता. त्याच्या निधनानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष कविता सवाई, सचिव गजानन भोयाळकर यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार बांगर, बिट जमादार वाघमारे, सामान्य रुग्णालयाचे डॉ. मुंढे, जय शंभो नारायण अंबुलन्सचे संचालक कुणाल राठोड, इंद्रपाल ताजणे व सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या सहकार्याने सुपखेला फाट्यावर या बेवारस इसमाच्या मृतदेहावर अंतीम संस्कार केले. संपूर्ण प्रक्रिया एका महिला असलेल्या कविताताई सवाई यांनी करुन समाजासमोर आदर्श प्रस्तापित केला आहे. सदर केंद्राच्या मदतीकरीता अनेक सामाजीक संस्था व कार्यकर्ते झटत असून, या केंद्राला आर्थिक पाठबळासमवेत समाजाचे मानसिक आधारही जरुरी आहे. त्यामुळे सुपखेला फाट्यावर या केंद्राला भेट देवून सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी तन,मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन कविताताई सवाई यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या