🌟वाशिम येथे सर्व शाखीय ब्राम्हण समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात....!


🌟महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ व ब्राह्मण सभेचा पुढाकार🌟

फुलचंद भगत

वाशिम - सर्व शाखीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ व ब्राह्मण सभेच्या आयोजनातून रविवार, ४ फेब्रुवारीला स्थानिेक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत सर्व शाखीय ब्राम्हण समाजाचा वधू-वर परिचय मेळावा दोन सत्रामध्ये उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधीज्ञ मधुकरराव अनसिंगकर, ना. ना. मुंदडा विद्यालय मालेगाव येथील राष्ट्रीय किर्तनकार तथा समर्थ अभ्यासक श्रीराम रोडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी नाईक, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल कुळकर्णी, मंडळाचे अध्यक्ष रमेशराव लक्रस मंचावर उपस्थित होते.  प्रारंभी दिप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी सध्याच्या काळात विवाह जुळण्यासंबंधी येणार्‍या समस्यांबाबत मार्गदर्शन व वधू-वर परिचय मेळाव्यांच्या आयोजनाचे महत्व सांगितले. उप वधुवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रमेशराव लक्रस यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राजेश संगवई यांनी करुन दिला. दुसर्‍या सत्रात आलेल्या उपवधुवरांचा परिचय करून देण्यात आला. या मेळाव्याकरिता अनेक ठिकाणावरून बहुसंख्य उप वधुवर व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश संगवई यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष विकास देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मंडळाचे सचिव माधवराव शेवलकर, कोषाध्यक्ष डॉ. सुहास पांडे, देविदत्त देव, पंकज लक्रस्, गजानन काळपांडे, गजानन बावणे, प्रसाद निरखी, शशिकांत दंडवते, सुहास लक्रस, शेखर जोशी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या