🌟पुर्णा तालुक्यातील सुरवाडीतील कोमल खिल्लारे (वाटोडे) यांची पोलीस पाटील पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न....!


🌟इंजिनीयर तथा समाजसेवक दिपक रणवीर यांच्या संयोजनाखाली पुर्णेत स्वागत समारंभाचे आयोजन🌟

पुर्णा (दि.17 फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील कोमल अनसाजी वाटोडे (खिल्लारे) यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुरवाडी गावच्या पोलीस पाटील पदी दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी निवड झाली.

त्या उच्चविद्याविभूषित असून बी कॉम,बीएड पर्यंतचे शिक्षण त्यांनी प्राविण्यामध्ये उत्तीर्ण केले वाचन लेखन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामध्ये त्यांना आवड आहे सुरवाडी येथील आंबेडकरी व धम्म चळवळीतील युवा कार्यकर्ते अनसाजी वाटोडे यांच्या त्या सहचरीणी आहेत त्यांच्या निवडीबद्दल पूर्णा या ठिकाणी इंजिनीयर समाजसेवक दीपक रणवीर यांच्या संयोजनाखाली स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रबोधनकार शाहीर गौतम कांबळे सामाजिक कार्यकर्ते धर्मराज कांबळे अनसाजी  वाटोडे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा हिशोब तपासणी श्रीकांत हिवाळे सर आदींची उपस्थिती होती.पुष्पगुच्छ व पेढे भरून त्यांचे स्वागत करण्यात आले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मा.श्रीकांतजी हिवाळे सर यांनी मनोगत व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या