🌟परभणी जिल्हा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य या संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर.....!


🌟यावेळी जिल्हा अध्यक्ष भाई रघुवीरसिंघ टाक यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी (दि.०१ फेब्रुवारी) - संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या निस्वार्थ कार्याने परिचित असलेली तसेच " नो निवेदन नो निषेध फैसला ओन द स्पॉट, मागेल त्याला न्याय" या तत्त्वावर कार्य करणारी तसेच गोर, गरीब, गरजू, अन्यायग्रस्त, फसवणूकग्रस्त, लोकांच्या मदतीला धाऊन जाणारी, लोकप्रिय सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या व संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ यांच्या कार्याला प्रेरित होऊन संघटनेत विविध सामाजिक कार्यकर्ते, वकील यांनी जाहीर प्रवेश केला आहे. 

त्या अनुषंगाने आज दिनांक 29 जानेवारी 2024  रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ, महाराष्ट्र महिला अध्यक्ष प्रियाताई वैद्य, महाराष्ट्र कार्याध्यक्ष  सिद्धार्थभाई राक्षे, मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड यांच्या आदेशाने दयावान सरकार परभणी जिल्हा कार्यालय, डॉ.आंबेडकर नगर येथे परभणी जिल्हा विधी सल्लागार पदी ऍड.आर.एल.वैराळे,परभणी जिल्हा विधी सल्लागार उपाध्यक्ष पदी ऍड. महेंद्र काळे, महिला परभणी तालुका अध्यक्ष महिला आघाडी पदी शांताताई कानडे, परभणी शहर अध्यक्ष पदी जनसेवक रमेश घनघाव व परभणी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी शेख अझहर आदी पदाधिकाऱ्यांची मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रघुवीरसिंगभाई टाक, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोदभाई अंभोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पुष्पहार घालून सत्कार करून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड हे होते. या वेळी प्रमोदभाई अंभोरे, ऍड. आर. एल. वैराळे, जनसेवक रमेश घनघाव, रघुवीरसिंगभाई टाक, संजयभाई गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप वायवळ, हरदिप सिंग बावरी, शेख कलीम, राहुल पंचांगे, सय्यद खदिर, प्राची काळे, आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या