🌟परभणी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या त्रुटीपूर्ततेसाठी मुदतवाढ....!


🌟विद्यार्थ्यांनी त्रुटीची पुर्तता 15 फेब्रुवारी पर्यंत करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले🌟

परभणी (दि.01 फेब्रुवारी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननी अंती विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे तसेच अर्जातील माहितीनुसार पात्र,अपात्र विद्यार्थी यादी तसेच त्रुटीची यादी या कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सदर यादीतील अपात्र, त्रुटीचे अर्जातील आक्षेप, त्रुटीची पुर्तता करण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांना 28 डिसेंबर,2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्रुटी पुर्तता केलेली नसल्याने सदर यादीतील विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारी, 2024 पर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ ही नुतणीकरण्याच्या अर्जातील त्रुटीपूर्ततेसाठी देखील देण्यात येत आहे. विहीत मुदतीत संबंधीत विद्यार्थ्यांने आक्षेप, त्रुटी पुर्तता न केल्यास अर्ज अंतिम अपात्र करण्यात येईल व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत त्रुटीची पुर्तता करण्याबाबतचे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या