🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादलेल्या नवीन काळ्या कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा आज पाचवा दिवस....!


🌟प्रशासनाचे आंदोलकांच्या न्यायिक मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ; आजी/माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा🌟

🌟सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादलेल्या नवीन काळ्या कायद्या विरोधातील आंदोलनाला मिळतोय जोरदार पाठिंबा🌟 

नांदेड (दि.१३ फेब्रुवारी) - महाराष्ट्र राज्य सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर पुर्वीचा गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ या कायद्यात बदल करुन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा सिख धर्मियांच्या धार्मिक मुलभूत अधिकारावर गदा आणणारा काळा कायदा संमत करून पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादल्याने त्या काळ्या कायद्या विरोधामध्ये दि.०९ फेब्रुवारी २०२४ पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील तब्बल पाच दिवसांपासून सिख समुदायाकडून लोकशाही मार्गाने साखळी उपोषण व निदर्शन सुरू असतांना या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 


   जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ हा कायदा बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम २०२४ हा काळा कायदा संमत केला आहे या कायद्याला सर्व सिख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज पाचवा दिवस असून आज मनिंदरसिंग रामगडिया, अर्जितसिंग गिल, रवींद्रसिंग बुंगई, सरबजीतसिंग होटलवाले यांनी उपोषण केले तर यांच्यासह गुरमीतसिंग महाजन, म नप्रितसिंग कुंजीवाले, अवतारसिंग पहरेदार, गुरमीतसिंग बेदी, रवींद्रसिंग पुजारी , जीतसिंग टाक, भागींदरसिंग घडीसाज, मनबिरसिंग ग्रंथी , जगजीतसिंग , प्रेमजीतसिंग शिलेदार , ग्यानी तेगासिंग बावरी , जगदीपसिंग नंबरदार, रणजीतसिंग चिरागिया, सुरीदरसिंग मेंबर यांनी सहभाग घेतला. आज मंगळवारी पाच दिवसाचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.


🌟सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादलेल्या नवीन काळ्या कायद्या विरोधातील आंदोलनाला मिळतोय जोरदार पाठिंबा🌟 

गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मंगळवारी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर,बबन बारसे, माधव पावडे जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा) यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड दक्षिणचे आ.मोहन अण्णा हंबर्डे,भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या