🌟महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील आंदोलनाला आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा...!


🌟नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ११ दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेल्या उपोषणार्थींची घेतली भेट🌟 


नांदेड : महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब अबचल गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या काळ्या कायद्याच्या विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ०९ फेब्रुवारी २०२४ पासून साखळी उपोषणाला बसलेल्या सिख धर्मिय बांधवांना आज तब्बल ११ दिवसांचा कालावधी उलटला परंतु जिल्हा प्रशासन या साखळी उपोषण आंदोलनाची दखल घेत नसले तरी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांकडून या आंदोलनाला भरघोस पाठिंबा मिळत आहे.


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेल्या सिख धर्मिय बांधवांना आज मंगळवार दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला यावेळी संबोधित करतांना आम आदमी पार्टीचे नेते ॲड जगजीवन भेदे म्हणाले की महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेला नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा कायद्या तात्काळ रद्द करावा व सिख धर्मियांसह सर्वधर्मीयांचे सर्वोच्च पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तख्त सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारात सातत्याने होणारा हस्तक्षेप थांबवावा असेही ते यावेळी म्हणाले यावेळी जेष्ठ नेते नरेंद्रसिंघ ग्रंथी सचिव डॉ.अवधूत पवार अदील जहागिरदार ॲड.राजु थोरात,ॲड.कुनाल गवळे,डॉ.हरिदास नरवाडे,ॲड.अमोल शिंदे सह शिख समुदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या