🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल घोटाळ्यातील फरार दोन आरोपींना न्यायालयाने सुनावली ०४ दिवसांची पोलीस कोठडी....!


🌟पुर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील कार्यालय अधिक्षक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही फरार🌟 


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पुर्णेतील रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील फरार टँकर मालक संतोष पवार राहणार वाटूर फाटा परतूर जिल्हा जालना व इंडियन ऑईल पेट्रोल पंप मॅनेजर रामचंद्र यादव राहणार वाटूर फाटा परतूर जिल्हा जालना यांना रेल्वे सुरक्षा बलाने दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी ताब्यात घेतले असून या दोघांना रेल्वे न्यायालय समोर हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने त्यांना दि.२१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुर्णा जंक्शन स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याच्या तपासा संदर्भात काल पुर्णेत आलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर या डिझेल घोटाळ्या प्रकरणी स्थानिक महाराष्ट्र पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत या गंभीर प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्याचा प्रकार तर करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे परभणी जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील डिझेल टँकर ताब्यात घेतला नसता तर कदाचित एकाच दिवशी घडलेला हा तिस लाख रुपयांचा डिझेल टँकर घोटाळा उघडकीस आलाच नसता परंतु स्थानिक महाराष्ट्र पोलीस दलाने सदरील रेल्वे डिझेल चोरी प्रकरण उघडकीस आणणे हे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या भलतेच जिव्हारी लागल्याचे या आरोपावरून निदर्शनास येते.

पुर्णेतील रेल्वे डिझेल डेपोतील जबाबदार अधिकारी/कर्मचारी व डिझेल माफियांच्या संगणमतातून मागील अनेक वर्षांपासून रेल्वे डिझेल चोरी अर्थात डिझेल घोटाळा सुरू असल्याचे बोलले जात असून सदरील डिझेल चोरीचा प्रकार यापूर्वी देखील अनेक वेळा उघडकीस आला परंतू त्यावर सोईस्करपणे थातूरमातूर कारवाया करुन पडदा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे सदरील प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालय (ईडी) कडे देण्यात आल्यास अब्जावधी रुपयांचा घोटाळा चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या