🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी टँकर मालक पवार यांचा आणखी एक डिझेल टँकर रेल्वे सुरक्षा बलाने केला जप्त....!


🌟डिझेल चोरी प्रकरणात याही डिझेल टँकरचा वापर ? डिझेल टँकर चालकास न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी🌟 


परभणी/पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी) - दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत धावणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वे गाड्यांच्या डिझेल इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोला डिझेल सप्लायी करणाऱ्या डिझेल टँकर चालक/मालकांनी संगणमत करुन मुख्य कार्यालय अधीक्षक व संबंधित रेल्वे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासना चुना लावीत असल्याचा गंभीर प्रकार मागील महिन्यात दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास परभणी-गंगाखेड-ताडकळस राज्यमार्गावरील सिंगणापूर फाट्यालगत परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेला पुरवठा करणाऱ्या डिझेल टँकर चालकासह ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाच्या स्वाधीन केले या घटनेमुळे रेल्वे डिझेल घोटाळा चव्हाट्यावर आल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात खळबळ माजली सदरील घटनेतील तिन आरोपी रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले असले तरी यातील दोन आरोपी अद्यापही फरार असून या घटनेतील आरोपी कार्यालयीन अधिक्षक मोहम्मद इस्लआऊद्दईन उर्फ मोबीन याचा अटकपूर्व जामीन अर्ज नुकताच दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी फेटाळून लावला तर आरोपी टँकर मलिक संतोष पवार हा सुद्धा अद्यापही फरार असतांनाच रेल्वे सुरक्षा बलाने दि.१५ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास रेल्वे कम्युनिटी हॉल समोरील रोडवर आरोपी संतोष पवार याच्या मालकीचे डिझेल टँकर क्र.एम.एच.०५ एएम ३४२० हे डिझेल टँकर देखील टँकर चालक , नागेश भिमराव शेकडे राहणार पतसारा तालुका जिल्हा बिड याच्यासह ताब्यात घेतले असून त्यास रेल्वे सुरक्षा बलाने सन्माननीय रेल्वे न्यायालय औरंगाबाद यांचे समोर दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी हजर केले असता त्यास न्यायालयाने दि.२० फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावरील डिझेल चोरी प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात आल्यास या डिझेल घोटाळ्यात गुंतलेले मोठमोठे मासे हाती येण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरील प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याने तपासाची दिशा हळूवारपणे बोलतांना पहावयास मिळत आहे दरम्यान या घटनेचा तपास रेल्वे सुरक्षा बलाचे पो.नि.श्री.अरविंद कुमार शर्मा,पो.नि.श्री रवी बाबू,स.फौजदार श्री शेख जावेद हे करीत आहेत.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या